कालसर्प शांती पूजा


कालसर्प शांती पूजा

जन्माच्या वेळेनुसार तयार करण्यात आलेल्या जन्म कुंडलीत बारा भाव / स्थान असतात. जन्म कुंडलीचे हे स्थान नवग्रहांची स्थिती आणि योग जातकाच्या भविष्याबाबत संपूर्ण माहिती प्रकट करते.

shri_kalsarp_nag-pash_yantra
जन्म कुंडलीच्या विभिन्नस्थानात या नवग्रहांची स्थिती आणि योगाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या शुभ अशुभ योग तयार होतात. हे योग त्या व्यतीच्या जीवनावर आपला शुभ अशुभ प्रभाव पाडतात. ग्रह जेव्हा जन्म कुंडलीच्या एका स्थानावर एकत्रित होतात तेव्हा जी परिस्थिती निर्माण होते तिला योग म्हणतात.

कालसर्प योगाचा विचार करण्यापूर्वी राहू व केतू बद्दल प्रथम विचार केला पाहिजे कारण राहू हे सापाचे मुखअसून केतू हे शेपूट आहे. या दोन ग्रहांमुळे कालसर्प योग होतो असे म्हणतात. कालसर्प योग जैन ज्योतिष ग्रंथातून रूढ झाला असावा.


मुख्य रूपाने १२ प्रकारचे कालसर्प योग असतात:


 • अनंत कालसर्प योग :

  जेव्हा लग्नामधे राहू व सप्तम भावामधे केतू असेल आणि त्याच्यामधे सर्व अन्य ग्रह यांच्यामधे असतील तर तो अनंत कालसर्प योग मानला जातो. या योगाच्या जातकाला जिवनभर मानसिक शांतता मिळत नाही.


 • कुलिक कालसर्प योग :

  जेव्हा जन्म कुंडलीच्या द्वितीय भावात राहू व अष्टम भावात केतू असेल व सर्व त्यांच्या मधे असतील तर तो योग कुलिक कालसर्प योग असतो. • वासुकि कालसर्प योग :

  जन्म कुंडलीच्या तिसर्या भावात राहू आणि नवव्या भावात केतू असेल व त्यांच्या मधे इतर सर्व ग्रह असतील तर तो योग वासुकी कालसर्प योग असतो. • शंखपाल कालसर्प योग :

  जेव्हा जन्म कुंडलीच्या चौथ्या भावात राहू व दहाव्या भावात केतू असेल आणि त्यांच्या मधे सर्व ग्रह असतील तर तो योग शंखपाल योग म्हणून ओळखला जातो. • पद्म कालसर्प योग

  जेव्हा जन्म कुंडलीच्या पाचव्या भावात राहू व अकराव्या भावात केतू असेल आणि त्यांच्या मधे सर्व ग्रह असतील तर तो योग पद्म कालसर्प योग म्हणून ओळखला जातो. • महापद्म कालसर्प योग

  जेव्हा जन्म कुंडलीच्या सहाव्या भावात राहू व बाराव्या भावात केतू असेल आणि त्यांच्या मधे सर्व ग्रह असतील तर तो योग महापद्म योग म्हणून ओळखला जातो. • तक्षक कालसर्प योग

  जेव्हा राहू जन्म कुंडलीच्या सातव्या भावात व केतू लग्नात असेल व इतर ग्रह त्यांच्या कैदेत असतील तर या द्वारे होणार्या योगास तक्षक कालसर्प योग म्हणतात. • >कर्कोटक कालसर्प योग

  जेव्हा जन्म कुंडलीच्या अष्टम भावात राहू व दुसर्या भावात केतू असेल व इतर ग्रह त्यांच्या मधे अडकले असतील तर त्यामुळे होणार्या योगाला कर्कोटक कालसर्प योग म्हणतात. • शंखनाद कालसर्प योग

  जेव्हा जन्म कुंडलीच्या नवव्या भावात राहू व तिसर्या भावात केतू असेल व इतर ग्रह यांच्यामधे अडकले असतील तर जो योग होतो त्याला शंखनाद कालसर्प योग म्हणतात


 • पातक कालसर्प योग

  जेव्हा जन्म कुंडली मधे राहू दहाव्या भावात व केतू चौथ्या भावात असेल व सर्व सातग्रह यांच्या मधे असतील तर हा योग पातक कालसर्प योग म्हटला जातो. • विशाधर कालसर्प योग

  जेव्हा जन्म कुंडलीच्या मधे राहू अकराव्या भावात व केतू पाचव्या भावात असेल व इतर ग्रह यांच्या मधे असतील तर जो योग होतो त्या योगाला पातक कालसर्प योग म्हणतात. • शेषनाग कालसर्प योग

  जेव्हा जन्म कुंडली मधे राहू बाराव्या भावात व केतू सहाव्या भावात असेल व इतर ग्रह यांच्या कैदेत असतील तर जो योग होतो त्याला शेषनाग कालसर्प योग म्हणतात.
अधिक माहितीसाठी संपर्क करा

श्री. पदमाकर बी. पिंगळे

+(91)-9922144835
+(91)-9323548982
+(91)-9322831290

ईमेल: contact@trimbakeshwarkalsarppooja.comCopyright ©2020 Trimbakeshwarkalsarppooja.com | Website developed by Nasik Services.Com